Breaking News

2020पर्यंत घराघरांत शुध्द पाणी

स्वातंत्र्यदिनी पंतप्रधानांनी केली जल जीवन योजनेची घोषणा

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था

2020पर्यंत सर्वांना घराघरांत शुध्द पाणी मिळावे यासाठी ‘जल जीवन’ योजनेची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या 73व्या स्वातंत्र्यदिनी घोषणा केली. यासाठी 3.5 लाख कोटी रुपये खर्च केले जाणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना  भारतीय संरक्षण दलाला आता चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) मिळणार आहे, अशीही महत्त्वाची घोषणा मोदींनी केली. या नवीन पदावर नियुक्त केली जाणारी व्यक्ती भारताच्या तिन्ही संरक्षण दलांचे प्रमुख म्हणून काम करणार आहे. या निर्णयामुळे लष्कर, हवाई दल आणि नौदल या तिन्ही दलांमध्ये सामंजस्य वाढेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट केले आहे. 70 वर्षांमध्ये जे झाले नाही ते काम या सरकारने 70 दिवसांत करून दाखवले. केंद्र सरकारने कलम 370 रद्द करण्यासाठी पुढाकार घेतला आणि रद्द केले. जनतेने दिलेले काम करण्यासाठी आज सत्तेमध्ये आलो आहोत. स्वातंत्र्यानंतरही या देशासाठी ज्यांनी योगदान दिले त्या सर्वांना नमन, असेही  पंतप्रधान मोदी म्हणाले.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply