पनवेल ः रामप्रहर वृत्त
ज.भ.शि.प्र. संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयात 9 ऑगस्ट रोजी अकरावीच्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या प्रमुखपदी प्राचार्य के. के. म्हात्रे होते. प्राचार्यानी मुलांना जनार्दन भगत संस्थेची ओळख करून दिली. स्वागत समारंभाच्या कार्यक्रमाबरोबरच मुलांसाठी निरनिराळ्या खेळाचे आयोजन करण्यात आले होते. सूत्रसंचालन सहशिक्षिका दुर्गादेवी मौर्या यांनी केले. आभार श्रेयस याने मानले. या कार्यक्रमाला चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर, अध्यक्ष अरुणशेठ भागत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, आमदार प्रशांत ठाकूर, सचिव डॉ. गडदे यांनी शुभेच्छा दिल्या.