पनवेल : महानगरपालिका प्रभाग क्रमांक 1 अंतर्गत तळोजा मजकूर गावातील सद्गुरू वामनबाबा महाराज पुण्यतिथी सोहळा 12 मार्च रोजी आहे. या सोहळ्यानिमित्त रायगड आणि ठाणे जिल्ह्यातील वारकरी भाविक-भक्त हजारोंच्या संख्येने येतात, पण तेथील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. ते रस्ते व्यवस्थित व्हावेत म्हणून पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांना तेथील परिस्थिती दाखवताना स्थानिक नगरसेवक संतोष बाबुराव भोईर, माजी सरपंच संतोष पाटील, संतोष का. पाटील आणि ग्रामस्थ उपस्थित होते, तसेच तेथील शील तलाव व शिवमंदिर यांचीही पाहणी करण्यात आली. सभागृह नेते परेश ठाकूर यांनी सर्व कामे वेळेवर होतील, असे आश्वासित केले.
