पनवेल : रामप्रहर वृत्त
भाजप युवा मोर्चा पनवेल शहर आणि रायगड जिल्हा कॅरम असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय आमदार चषक कॅरम स्पर्धेचे उद्घाटन शनिवारी (दि. 17) महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.
पनवेल येथील तालुका क्रीडा संकुलात खेळल्या जाणार्या कॅरम स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर विक्रांत पाटील, नगरसेवक अनिल भगत, मनोहर म्हात्रे, नितीन पाटील, नगरसेविका दर्शना भोईर, हेमलता म्हात्रे, रायगड जिल्हा कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश तुळपुळे, उपाध्यक्ष व आंतरराष्ट्रीय पंच सुहास कारभारी, भाजप युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष व आयोजक प्रीतम म्हात्रे, सोशल मीडिया शहर संयोजक प्रसाद हनुमंते आदी उपस्थित होते.
स्पर्धेचे बक्षीस वितरण रविवारी (दि. 18) सायंकाळी 6 वाजता सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कम आणि चषक देऊन गौरविण्यात येणार आहे.
आयोजक कमिटीचे निखिल कोशिंबकर, सचिन नाईक, विराज सावंत, अतिष कल्याणकर, संजय कथार, अक्षय ताटे, सुनील गुरव, आशिष देशमाने, हरेश म्हात्रे, राजेश जाधव, श्याम धायवट व अन्य सदस्य स्पर्धा यशस्वितेसाठी परिश्रम घेत आहेत.
RamPrahar – The Panvel Daily Paper