Breaking News

‘कौन है समझदार’

पनवेलमध्ये पथनाट्यातून एड्सविषयक जनजागृती

पनवेल : प्रतिनिधी

नवीन पनवेलमधील अश्वत्थामा ज्येष्ठ नागरिक संघाच्या मदतीने स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला लोकपरिषद आणि आश्रय सोशल फाऊंडेशने एचआयव्हीच्या जागृतीसाठी  ‘कौन है समझदार ’ या पथनाट्याद्वारे पनवेल परिसरात एड्सबाबत जनजागृतीचा संदेश देऊन एड्समुक्त भारताचा नारा दिला. रायगड जिल्ह्यात पनवेल आणि आजूबाजूचा परिसरात जागेला आलेली सोन्याची किंमत त्यामुळे अनेकांच्या हातात पैसा खुळखुळू लागला आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणात असलेले लेडिज बार त्याची साक्ष देत आहेत. तरुण पिढी त्याच्या आहारी गेल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या भागात एचआयव्हीबाधित रुग्ण सापडत आहेत. यासाठी सुरक्षित लैंगिक सबंधांबाबत जनजागृती करण्यासाठी नवीन पनवेलमधील अश्वत्थामा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्रकाश विचारे सचिव साहेबराव जाधव आणि सहकार्यानी पुढाकार घेऊन गुरुवार 14 ऑगस्ट रोजी  लोकपरिषद आणि आश्रय सोशल फाऊंडेशनच्या ‘कौन है समझदार’ या पथ नाट्याद्वारे जनजागृती केली नवीन पनवेल रेल्वेस्टेशन जवळील बस स्टॉप जवळील अश्वत्थामा ज्येष्ठ नागरिक संघाचे कट्ट्यावर हे पथनाट्य अशोक गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली मनीषा अहिवाल, ऊर्मिला यादव, शिल्पा हलंकर, अश्विनी लोंढे, दीक्षा गावंड, रुकाया बालगीर, प्रज्ञा कांबळे, कल्पना ठोकळ, जयश्री जाधव, संजना तांबे, करन निकम आणि सुषमा पवार यांनी सादर केले. या वेळी पिल्लई महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी हे पथनाट्य पाहून या समाजसेविकांना अनेक प्रश्न विचारून एड्सबाबत शंकांचे निरसन केले. मनीषा अहिवाळ यांनी त्यांच्या शंकांचे निरसन केले.

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply