उरण : वार्ताहर
रयत शिक्षण संस्थेच्या वीर वाजेकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा विभाग व पी. एस. पेथॉलॉजीकल लॅब मोहोपाडा यांच्या वतीने बुधवारी (दि. 21) महाविद्यालयातील विद्यार्थिनींची मोफत रक्त तपासणी करण्यात आली. या शिबिरात सुधीर घरत, अध्यक्ष माजी विद्यार्थी संघ, वीर वाजेकर कॉलेज फुंडे हे उपस्थित होते. रायगड जिल्ह्यातील महिलांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण खूप कमी असल्याने त्यांना भविष्यात आरोग्याच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यासाठी फुंडे कॉलेजमध्ये दरवर्षी मुलींची मोफत रक्त तपासणी करून कमी हिमोग्लोबिन असलेल्या विद्यार्थिनींना हिमोग्लोबिन वाढीच्या गोळ्या शासनाच्या वतीने मोफत देण्यात येणार आहेत, तसेच सदर विद्यार्थिनींना आहार समुपदेशनही करण्यात येते. मोफत रक्त तपासणी पी. एस. लॅबोरेटरी, मोहोपाडाच्या संचालिका प्रतिभा पाटील ठाकूर यांच्यातर्फे करण्यात येते. या शिबिरात 180 मुलींची रक्त तपासणी करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांची ओळख एनएसएस प्रमुख प्रा. डॉ. आमोद ठक्कर यांनी करून दिली, तर स्वागत सुधीर घरत यांनी केले. प्रा. यू. टी. घोरपडे, डॉ. एम. सी. सोनावले हे उपस्थित होते. शिबिर यशस्वी करण्यासाठी डॉ. झेलम झेंडे, प्रा. गोटपागर, प्रा. आर. डी. कांबळे, प्रा. आर. एफ. इनामदार यांनी विशेष परिश्रम घेतले.