पनवेल : बातमीदार
आपल्या देशात अंध लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात असून, अन्य लाखो लोक डोळ्यांच्या समस्येने पीडित आहेत. बर्याचदा डोळ्यांच्या आजारावर योग्य सल्ला आणि वेळेत उपचार न मिळाल्याने अचानक अंधत्व आलेले अनेक लोक आपण आजूबाजूला पाहतो. खरे तर त्यांना वेळेत योग्य सल्ला आणि मार्गदर्शन मिळाले असते, तर कदाचित त्यांचे डोळे वाचूही शकले असते. ऑप्टोमेट्री हे क्षेत्र करिअरच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. मानव कल्याणाच्या कार्यात या क्षेत्राद्वारे योगदान देता येईल. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक, या विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टच्या लक्ष्मी कॉलेज ऑफ ऑप्टोमेट्री तर्फे ऑप्टोमेट्रीस्ट बनण्यासाठी ऑप्टोमेट्री या क्षेत्रात पदवी कोर्सची सुरुवात झाली असून या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी बारावी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या विषयातून 50 टक्के (पीसीबी 50%) गुणासहित उत्तीर्ण असण्याची अट आहे. यासाठी ुुु.श्ररुाळलेश्रश्रशसश.ेीस अथवा 9594986831/29 या क्रमांकावर संपर्क साधून इच्छुक विद्यार्थी अधिक माहिती घेऊ शकतात. लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टच्या लक्ष्मी कॉलेज ऑफ ऑप्टोमेट्री या कॉलेजमधला नेत्रविकार अभ्यासक्रम प्रतिष्ठेचा मानला जातो. हा बारावीनंतर चार वर्षांचा बी. ऑप्टोमेट्री असा पदवी अभ्यासक्रम आहे. हे कॉलेज लक्ष्मी चॅरिटेबल संस्थेतर्फे चालवले जाते. या अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना तीन वर्षे पनवेलच्या संस्थेत शिक्षण दिले जाते आणि शेवटच्या वर्षाचे शिक्षण, तसेच प्रात्यक्षिक ज्ञान त्यांना लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट आणि लक्ष्मी आय इन्स्टिट्यूटमध्ये दिले जाते.