रोहा : प्रतिनिधी
तालुक्यातील कोलाड येथील स्नेह ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी मंडळाचा नववा वर्धापनदिन वसंत महाबळे यांच्या आंबेवाडी येथील निवासस्थानी उत्साहात संपन्न झाला. या वेळी 70 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व 50 वर्ष पूर्ण झालेल्या जोडप्यांचा सन्मानपत्र, समई, ताम्हण आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. मंडळाचे चिटणीस अशोक कदम यांनी अहवाल व जमाखर्चाचे वाचन केले. हरिचंद्र जाधव, बळीराम खैर यांनी पूरग्रस्तांना मदत जाहीर केली. मंडळाचे अध्यक्ष गोरखनाथ कुर्ले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या वर्धापन दिन सोहळ्याला मंडळाचे उपाध्यक्ष नारायण दहिंबेकर, वसंत सावरकर, सहचिटणीस मंगल राऊत, प्रवीण गांधी, लक्ष्मण कदम, अविनाश म्हात्रे, केशव महाबळे, बळीराम ठोंबरे, अनंता पवार, बाळ कापसे, सोनू दळवी, दगडू बामुगडे, नंदा पवार, अलका पांढरकामे, सुनीता बामुगडे, प्रणिता गांधी यांच्यासह सुमारे 200 ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.