Breaking News

नेरळ पंचवटी येथील रस्त्याचा एक भाग बंद

कर्जत : बातमीदार

दरड कोसळण्याची भीती असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने गेल्या 20 दिवसांपासून कर्जत-नेरळ-कल्याण या रस्त्याचा पंचवटी जिते फाटा वाहतुकीसाठी बंद केला आहे. दरम्यान, या ठिकाणी रात्रीच्या वेळी अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कर्जत-नेरळ-कल्याण मार्गावर जिते फाटा येथे असलेल्या खासगी टेकडीवर गेली काही वर्षे माती उत्खनन केले जात आहे. त्यामुळे त्या टेकडीचा मोठा भाग यावर्षी कोसळून रस्त्यावर आला. त्यामुळे या रस्त्यात अपघात होऊ शकतो  ही बाब लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने जिते फाटा येथे रस्त्याचा कर्जत येथून नेरळकडे जाणारा भाग वाहतुकीसाठी बंद केला आहे. त्याला 20 दिवस झाले तरी सार्वजनिक  बांधकाम विभागाने त्या ठिकाणी पडलेले दगड आणि माती अद्याप उचलली नाही. त्यामुळे 27 जुलैपासून वाहतुकीसाठी बंद केलेला रस्ता आजही बंदच आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने या रस्त्यावर पडलेली माती आणि दगड बाजूला करावेत आणि हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात यावा, अशी मागणी वाहनचालक करीत आहेत.

Check Also

रक्तसाठा अद्ययावत माहितीच्या मुद्द्यावर आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी वेधले शासनाचे लक्ष

रक्तसाठ्याची माहिती वेळेवर अद्ययावत न करणाऱ्या रक्तकेंद्रांवर दंडात्मक कारवाई -आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर मुंबई : रामप्रहर …

Leave a Reply