Breaking News

सोने पॉलिशच्या बहाण्याने फसवणूक; दोघांना अटक

जेएनपीटी : प्रतिनिधी

दागिन्यांना पॉलिश करून देतो, असे सांगून महिलांना गंडा घालणारी टोळी उरणमध्ये सक्रिय झाली आहे. सारडे येथे अशा प्रकारे फसवणूक करणार्‍या दोघांना उरण पोलिसांनी अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींची नावे पप्पू कुमार पासवान आणि अनंत कुमार साहा (दोघेही रा. बिहार) अशी आहेत.उरण तालुक्यातील सारडे गावातील पुष्पलता राजेश म्हात्रे या महिलेला मंगळवारी (दि. 26) पप्पू कुमार पासवान आणि अनंत कुमार साहा या दोन आरोपींनी दागिने चमकवून देतो, असे सांगून तिच्याकडच्या दागिन्यांमधील सोने विरघळवून काढून घेतले. सुरुवातीला महिलेचा विश्वास संपादन करण्यासाठी दोघा भामट्यांनी तिच्याकडील चांदीचे पैंजण पॉलिश करून दिले आणि नंतर तिच्या गळ्यातील दोन तोळ्याचे मंगळसूत्र पॉलिश करण्यासाठी घेतले. मंगळसूत्र पॉलिश करताना चलाखीने काही रासायनिक पदार्थांच्या सहाय्याने त्यातील सोने काढून घेतले. मात्र या महिलेला मंगळसूत्र हलके झाल्याचे लक्षात आल्यानंतर गावकर्‍यांच्या मदतीने या दोघांना पकडून पोलिसांकडे दिले. पॉलिश करण्याच्या बहाण्याने या दोघांनी मंगळसूत्रातील तीन ग्रॅम सोने काढून घेतले होते. उरण पोलिसांनी आपला खाक्या दाखविल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून सध्या ते पोलीस कोठडीत आहेत. या प्रकरणी सहा. पोलीस निरीक्षक निलेश तांबे हे उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश कुळकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास करीत आहेत.

Check Also

कळंबोलीत रंगणार कुस्त्यांचा आखाडा

विजेत्याला मिळणार पाच लाख रुपये व मानाची गदा पनवेल : प्रतिनिधीउदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय …

Leave a Reply