उरण ः वार्ताहर
शेवटचा श्रावणी सोमवार असल्याने भक्तांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. उरण शहरातील देऊळवाडी येथील संगमेश्वर, बोरी गावातील होणेश्वर, केगाव ग्रामपंचायत हद्दीतील माणकेश्वर, घारापुरीतील शंकर मंदिर, उरण रेल्वेस्टेशनजवळील नीळकंठेश्वर, सोनारी गावाजवळील फदलेश्वर आदी शंकराच्या मंदिरामध्ये भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. देवळामध्ये अभिषेक सत्यनारायण पूजा करीत असताना भक्तगण दिसत होते.
पहाटेपासूनच शंकर मंदिरासमोर भक्तांनी रांगा लाऊन दर्शन घेतले. प्रत्येक मंदिरासमोर बेल, बेल फळ, फुले, हार, नारळ आदी पूजेच्या सामानाची दुकाने थाटण्यात आली होती.
माणकेश्वर मंदिराचे अध्यक्ष शैलेंद्र म्हात्रे, सचिव दिगंबर म्हात्रे, सदस्य रूपेश ठाकूर व कविता शैलेश म्हात्रे, नूतन म्हात्रे, दीक्षिता मोकल, सामाजिक कार्यकर्ते नितीन पाटील, शंकरशेठ तांडेल, उरण बोकडवीरा येथील प्यूअर लाइफ मिनरल वॉटर कंपनीचे सहकार्य मिळाले. त्याचप्रमाणे मंदिराचे पूजारी दत्तात्रेय वामन पाटील यांचेही सहकार्य मिळाले व माजी नगरसेवक नवीन राजपाल यांच्या वतीने शेवटच्या सोमवारी सकाळी फराळाची खिचडी, दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले, तसेच मोरा सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.