पनवेल : रामप्रहर वृत्त
नावडे गावात असलेल्या स्मशानभूमीत पाण्याची टाकी बांधण्यात आली असून या टाकीचे लोकार्पण पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते मंगळवारी (दि. 5) झाले. या वेळी त्यांनी या स्मशानभूमीतील इतरही कामे मार्गी लावणार असल्याची ग्वाही दिली.
नावडे येथे मोठ्या प्रमाणात नागरीकरण वाढत असून तेथील स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी आलेल्या मृताच्या नातेवाईकांना पाण्याची समस्या उद्भवत होती. या संदर्भात भाजप युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस दिनेश खानावकर यांनी माजी सभागृह नेते परेश ठाकूर तसेच महापालिकेकडे पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला यश आले असून नावडे येथील स्मशानभूमीत महापालिकेच्या वतीने एक लाख 90 हजार रुपये खर्चून पाण्याची टाकी बांधण्यात आली आहे. या टाकीचे लोकार्पण माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते झाले.
या कार्यक्रमास ज्येष्ठ नेते सुरेश खानावकर, रामबुवा खुटारकर, विशाल खानावकर, भालचंद्र खानावकर, भूपेश खानावकर, मंगेश खानावकर, प्रताप चव्हाण, राजेश पाटील, आनंद सोनावणे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते. या वेळी युवा नेते दिनेश खानावकर यांनी स्मशानभूमीतील इतर कामांची माहिती माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांना दिली. परेश ठाकूर यांनी ही कामे लवकरात लवकर मार्गी लावणार असल्याचे सांगत खानावकर यांच्या कार्याचे कौतुक केले.
Check Also
कर्जतमध्ये तिहेरी हत्याकांड
जमिनीच्या वादातून कुटुंबातील तिघांचा खून; संशयित तरुण पोलिसांच्या ताब्यात कर्जत, नेरळ : प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील …