बीड : प्रतिनिधी
पुत्रप्राप्तीसाठी सम-विषम तिथीचा फॉर्म्युला कीर्तनातून सांगणार्या प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) महाराजांनी दोन तासांच्या कीर्तनात एखादे वाक्य चुकीचे जाऊ शकते असे स्पष्टीकरण देत हे सगळे थांबले नाही, तर कीर्तन सोडून शेती करेन, अशी हताश प्रतिक्रिया दिली आहे. बीडमधील परळी येथे शुक्रवारी (दि. 14) झालेल्या कीर्तनात त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
पुत्रप्राप्तीबाबत मी जे काही बोललो ते काही ग्रंथांमध्ये लिहिले आहे, मात्र जो काही वाद झाला त्यामुळे मला खूप त्रास झाला, मी उद्विग्न झालो आहे. दोन दिवसांत माझे वजनही कमी झाले आहे. आता एक-दोन दिवस वाट पाहीन. वाद थांबला नाही, तर कीर्तन सोडून शेती करेन, असे इंदुरीकर महाराज म्हणाले.
बाऊन्सरची सुरक्षा; व्हिडिओ शूटिंगला बंदी
अहमदनगर : वादानंतर प्रथमच इंदुरीकर महाराज नगर येथील भिंगार येथे कीर्तनासाठी शनिवारी (दि. 15) आले होते. या वेळी महाराजांच्या सुरक्षेसाठी खासगी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. बाऊन्सरच्या कड्यामध्येच ते कीर्तनस्थळी आले, तसेच कीर्तनाच्या शूटिंगलाही बंदी करण्यात आली. या वेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
Check Also
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …