Breaking News

विवेक पाटील आता आणखी आठ दिवस कोठडीतच; न्यायालयीन सुनावणी येत्या मंगळवारी

पनवेल : कर्नाळा बँक घोटाळाप्रकरणी माजी आमदार विवेक पाटील यांना अटक झाल्यानंतर पहिली दिवाळीही जेलमध्येच काढावी लागली. सोमवारी (दि. 8) त्यांची कर्नाळा बँक घोटाळाप्रकरणी विशेष सत्र न्यायालयात झालेल्या सुनावणीत न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडी 16 नोव्हेंबरपर्यंत वाढविली आहे. कर्नाळा बँक घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार आणि बँकेचे चेअरमन, तसेच शेकापचे नेते व माजी आमदार विवेक पाटील यांच्या जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी झाली. पक्षकारांच्या वतीने वकिलांचे म्हणणे न्यायालयाने ऐकले. न्यायालयाची सुनावणी आता मंगळवार 16 नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे विवेक पाटील यांचा तळोजा जेलमधील मुक्काम आठ दिवसांनी वाढला आहे.

Check Also

तीनही निवडणूक आयुक्तांच्या पत्रकार परिषदेमुळे राहुल गांधींचा फेक नॅरेटिव्ह उद्ध्वस्त!

‌‘वोटचोरी‌’चा आरोप करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे; आमदार प्रशांत ठाकूर यांचा विरोधकांवर घणाघात पनवेल : रामप्रहर वृत्ततीनही …

Leave a Reply