उरण : प्रतिनिधी
हिंदवी स्वराज्य संघटनेच्या अकराव्या वर्धापन दिनानिमिताने मुंबई येथे नुकतेच विविध क्षेत्रांत उलेखनीय कामगिरी केलेल्या युवा व युवतींना राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संपूर्ण महाराष्ट्रातून 200 जणांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या वेळी गोपाळ दिनकर म्हात्रे (सारडे, ता. उरण) यांना क्रीडा व समाजसेवेतील प्रबोधनकार ठाकरे समाजसुधारक पुरस्कार 2019 आणि अमिता अरुण घरत व अमिषा घरत (दोघी रा. केळवणे, ता. पनवेल) यांना साने गुरुजी समाजभूषण पुरस्कार 2019ने गौरविण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून मंत्री एकनाथ शिंदे, आमदार अजय चौधरी, संस्थेचे अध्यक्ष प्रकाश जाधव, सुरेश साळवी, सचिव सूरज भोईर, सिनेअभिनेत्री पूर्णिमा ओव्हल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
पुरस्कार प्राप्त विद्यार्थी व शिक्षकांचे निगा फाऊंडेशनचे अध्यक्ष निलेश गावंड, सुयश कलासेसचे अध्यक्ष निवास गावंड, सारडे विकास मंचचे अध्यक्ष नागेंद्र म्हात्रे, गोल्डन जुब्लीचे अध्यक्ष माधव म्हात्रे, अनिल घरत, दिनेश म्हात्रे, अविनाश गावंड, नरेश गावंड, सत्यवान म्हात्रे, मुकेश गावंड, साईनाथ पाटील, समीर गावंड, समीर ठाकूर यांनी अभिनंदन केले.