उरण : वार्ताहर
जेएनपीटी विश्वस्त तथा भाजप जिल्हा सरचिटणीस महेश बालदी यांनी उरण तालुक्यातील बालई गावातील श्री गणपती मंदिराची दुरुस्ती व शेडचे काम स्वखर्चाने करून दिले. त्याबद्दल बालई गावातील ग्रामस्थांनी महेश बालदी यांचे आभार मानले आहेत. या वेळी भाजपा उरण तालुका अध्यक्ष तथा नगरसेवक रवी भोईर, उरण शहराध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शहा, बालई बूथ अध्यक्ष राजेश म्हात्रे, महेश माळी, प्रशांत माळी, चेतन पाटील, भारत पाटील, राकेश पाटील, जतीन माळी, मनोहर सहतिया आदी उपस्थित होते.