Breaking News

‘महावितरण’ने तोडला बीएसएनएलचा वीजपुरवठा

महाड : प्रतिनिधी

महाड शहर व तालुक्यातील भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल)ची सेवा गेल्या दोन दिवसांपासून कोलमडली असून यामुळे शहरातील शासकीय कार्यालये, एटीएम आणि बँकांच्या कामकाजावर परिणाम झाला आहे. बीएसएनएलच्या तालुक्यातील सर्व मोबाईल टॉवर आणि वीजपुरवठा महावितरणच्या कार्यालयाने तोडला आहे. भारत संचार निगमकडून वीज बिल थकीत झाल्यामुळे हा वीजपुरवठा तोडला असल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली आहे.

महाडमध्ये बीएसएनएलची सेवा खंडित झाली आहे. यामुळे मोबाईल, ब्रॉडबॅन्ड, दूरध्वनी, लीज लाईन, लॅन्डलाईन आदी सेवा बंद आहेत. महाडसह तालुक्यातही अशी अवस्था निर्माण झाल्याने भारत संचार निगमच्या सेवेवर अवलंबून असलेल्या सर्वच सेवांचा कारभार कोलमडला आहे. शासकीय कार्यालये, एटीएम, खाजगी कार्यालये, दुकानदार, व्यापारी वर्गाचे यामुळे नुकसान झाले आहे. याचा परिणाम सर्वच कार्यालयांवर झाला आहे. ऐन पावसाळ्यात आपत्कालीन स्थितीत महावितरण कार्यालयाने कारवाई केल्याने ग्राहक आणि नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.

भारत संचार निगम लिमिटेडने महावितरणची वीज बिल थकबाकी असल्याने वीजपुरवठा खंडित केला आहे.

-चंद्रकांत केंद्रे, उपअभियंता महावितरण, महाड

बीएसएनएलकडून वीज बिल थकीत असल्याने वीजपुरवठा खंडित केला आहे, मात्र वरिष्ठ कार्यालयाकडून हालचाली सुरू असून, येत्या दोन दिवसांत सर्व व्यवस्था पूर्वपदावर येईल.

-सी. एन. सोनार, विभागीय अभियंता, बीएसएनएल, महाड

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply