Breaking News

फुंडे हायस्कूल येथे गायन स्पर्धा

उरण ः वार्ताहर

उरण-फुंडे येथील रयत शिक्षण संस्थेचे, तु.ह.वाजेकर उच्च माध्यमिक विद्यालयात  मंगळवारी (दि.10) रायगड विभागीय गायन स्पर्धा अतिशय उत्साहात झाली.

विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी रयत शिक्षण संस्था सातारा, कर्मवीर विद्याप्रबोधिनी संचालित-रायगड विभागीय गायन स्पर्धेचे दरवर्षी आयोजन करण्यात येते. ही स्पर्धा उरणच्या फुंडे हायस्कूल येथे आयोजित करण्यात आली होती.

रायगड विभागाचे विभागीय अधिकारी संजय मोहिते, विद्यालयाचे प्राचार्य मोहन पाटील, उपमुख्याध्यापक ए.यू.खाडे, पर्यवेक्षक आशा मांडवकर, जी.सी.गोडगे, व्ही.के.कुटे, एस.एम.बल्लाळ, एस.एन.गुजर, के.के.म्हात्रे आदी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन आणि दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.

फुंडे विद्यालयातील मुलींनी गोड आवाजात रयत गीत व स्वागत गीत सादर केले. विद्यालयाचे प्राचार्य मोहन पाटील, यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून स्पर्धक विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. तर रायगड विभागीय अधिकारी संजय मोहिते यांनीही उपस्थित स्पर्धक विद्यार्थी आणि रयत सेवकांचे स्वागत करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. या गायन स्पर्धेसाठी संपूर्ण रायगड विभागातील विविध शाखांतील एकूण 100 विद्यार्थी सहभागी झाले होते.

गट क्र.1-इ.5 वी ते 7 वी, गट क्र.2-इ.8 वी ते 10 वी, गट क्र.3-इ 11 वी ते 12 वी अशा तीन गटांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली. सर्व स्पर्धक विद्यार्थ्यांनी आपल्या गोड  आवाजात अभंग, भक्तीगीत, भावगीत अशा सुंदर गीतांचा नजराणा पेश केला. स्पर्धेचे एस.आर.गावंड, एच.एन.पाटील, प्राजक्ता म्हात्रे यांनी अतिशय निरपेक्षपणे परीक्षण केले. या स्पर्धेत उलवा, वावंजे, पोलादपूर, नावडे, वाशी, फुंडे, पारगाव येथील विद्यार्थ्यानी यश संपादन केले.

एकूण तीन गटांमध्ये फुंडे शाखेतील चार विद्यार्थ्यांनी बक्षिसे मिळविली. विजयी स्पर्धकांना बक्षिस समारंभात मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक व रोख रकमेचे पारितोषिक देवून गौरविण्यात आले. विद्यालयातील सर्व सेवक वृंदानी या कार्यक्रमाचे छान नियोजन

करून ही स्पर्धा यशस्वी केली.

उलवे विद्यालयाचे सुयश

गीत गायन स्पर्धेत पनवेल तालुक्यातील उलवे येथील न्यू इंग्लिश विद्यालयातील आदित्य खंदारे आणि ऋतुजा साळुंखे यांनी सहभाग घेतला होता.

स्पर्धेतील दुसर्‍या गटात ऋतुजा साळुंखे या विद्यार्थीनीने प्रथम क्रमांक पटकाविला.ऋतुजाच्या या यशाबद्दल ऋतुजाचे आणि मार्गदर्शक शिक्षक एस.आर.गावंड यांचे विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.के. पाटील,चेअरमन शरद खारकर आणि सर्व शिक्षक यांनी अभिनंदन केले.

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply