नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारताची उदयोन्मुख नेमबाज ईलाव्हेनिल व्हालारिव्हन हिने ‘आयएसएसएफ’ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत महिलांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदकावर नाव कोरले, परंतु ऑलिम्पिक स्पर्धेचे स्थान निश्चित करण्यात ती अपयशी ठरली आहे.
20 वर्षीय ईलाव्हेनिलने 251.7 इतके गुण कमावले, तर ब्रिटनच्या सीओनैड मॅकिन्टोश (250.6) आणि चायनीज तैपईच्या यिंग लिन (249.5) यांना अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. ईलाव्हेनिलचे हे वरिष्ठ गटातील पहिलेच सुवर्णपदक ठरले आहे.