Breaking News

श्रीरामपूरमध्ये ‘रयत’च्या शैक्षणिक इमारतींचे उद्घाटन आणि नामकरण

नगर : रामप्रहर वृत्त

श्रीरामपूर येथील रयत शिक्षण संकुलांतर्गत विविध इमारतींचे उद्घाटन आणि नामकरण सोहळा शुक्रवारी (दि. 30) संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते झाले. या सोहळ्यास मॅनेजिंग कौन्सिल सदस्य तथा माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

संस्थेच्या शताब्दी महोत्सवानिमित्त चेअरमन डॉ. अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यास आमदार भाऊसाहेब कांबळे, संस्थेच्या जनरल बॉडी सदस्य सरोजताई पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तर उपाध्यक्ष अरुण पाटील, व्हाईस चेअरमन अ‍ॅड. भगिरथ शिंदे, सचिव डॉ. भाऊसाहेब कराळे, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य मीनाताई जगधने, राजेंद्र फाळके, सुजाता पोखरकर, उत्तर विभागीय सल्लागार समितीचे अध्यक्ष दादाभाऊ कळमकर यांची विशेष उपस्थिती लाभली.

उपस्थितांचे स्वागत प्राचार्य डॉ. के. एच. शिंदे, डॉ. एल. डी. भोर, डॉ. मुकुंद पोंधे, मुख्याध्यापक संजय दवंडे, दिलीप नाईक यांनी केले. या वेळी प्रमुख मान्यवरांनी विचार व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply