Breaking News

तिघर शाळेतील मुलांचे नाव मंगळावर झळकणार; ‘नासा’च्या उपक्रमात अनोखा सहभाग

कर्जत : बातमीदार

नासा या अमेरिकन अंतराळ संशोधन संस्थेची बहुउद्देशीय मंगळ मोहीम जुलै 2020मध्ये प्रस्तावित आहे. हे यान रायगड जिल्हा परिषदेच्या कर्जत तालुक्यातील तिघर शाळेतील विद्यार्थ्यांची नावे सोबत घेऊन अमेरिकेच्या फ्लोरिडा प्रांतातील प्रक्षेपण केंद्रातून मंगळाच्या दिशेने झेपावणार आहे.

मानवाचे पाऊल मंगळ ग्रहावर पडण्याअगोदर आपले नाव मंगळावर पाठविण्याची संधी नासा या संस्थेने जगभरातील सर्व जनतेला उपलब्ध करून दिली आहे. अतिशय सूक्ष्म आकाराच्या चिपवर नावे कोरून ही चिप मंगळयानासोबत त्या ग्रहावर पाठविली जाणार आहे. जनसामान्यांमध्ये अवकाश संशोधनाबद्दल जागृती व्हावी, तसेच विद्यार्थी प्रेरित होऊन भविष्यात त्यांच्यामधून अंतराळवीर घडावेत यासाठी मंगळावर नाव पाठविण्याचा उपक्रम ‘नासा’ने

राबिवला आहे. कर्जत तालुक्यात डोंगरदर्‍यांच्या पायथ्याशी वसलेल्या तिघर गावात निसर्गरम्य वातावरणात जिल्हा परिषदेची शाळा आहे. या शाळेतील तंत्रस्नेही शिक्षक जनार्दन उमाजी पजई यांनी केंद्रप्रमुख नलिनी साळोखे, मुख्याध्यापक ईश्वर भगवान इंगळे, शिक्षिका सविता अशोक खडे, योगिता वाघ यांच्या सहकार्याने इयत्ता पहिली ते सातवीच्या सर्व विद्यार्थ्यांच्या नावांची आणि गावातील नागरिकांचीसुद्धा ऑनलाईन नोंदणी केली आहे. यासाठी मिळालेल्या बोर्डिंग पासचे नुकतेच वाटप करण्यात आले.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply