Breaking News

कळंबोली येथे आरती संग्रहाचे प्रकाशन

कळंबोली ः गणेशोत्सवानिमित्त भाई भाई ग्रुप आणि भाजप कळंबोली शहर उपाध्यक्ष नितीन काळे यांनी आरती संग्रह तयार केले आहेत. या आरती संग्रहाचे प्रकाशन सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. या वेळी ओम साईराम इंटरप्रायजेसचे श्रीनिवास म्हात्रे, माजी उपसरपंच विश्वास म्हात्रे, कळंबोली शहर उपाध्यक्ष नितीन काळे, श्रीकांत ठाकूर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

सिडकोमधील कर्मचार्‍यांकडून जीवनोपयोगी वस्तूंची मदत

पनवेल ः सांगलीमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सिडकोमधील कर्मचार्‍यांकडून जीवनोपयोगी वस्तूंची मदत पाठवण्यात आली आहे. यामध्ये तांदूळ, गहू, पीठ, तेल, साखर, चहा, मसाला, हळद इत्यादी वस्तूंचा समावेश आहे. या सामानाचे दोन टेम्पो सिडको भवन येथून सांगलीला गुरुवारी रवाना करण्यात आले आहेत. या वेळी सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. प्रशांत नारनवरे, मुख्य दक्षता अधिकारी निसार तांबोली, व्यवस्थापक फैय्याज खान, जनसंपर्क अधिकारी प्रिया रातांबे, सिडको कर्मचारी संघटना अध्यक्ष नीलेश तांडेल यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

रिटघर येथे मोफत आरोग्य व नेत्रतपासणी शिबिर

पनवेल ः जनआधार धर्मादाय संस्था, नायर आय हॉस्पिटल आणि मित्र हॉस्पिटल खारघर यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच रिटघर येथे मोफत आरोग्य व नेत्रतपासणी शिबिर झाले. या शिबिरात मोतिबिंदू शस्त्रक्रिया व चष्मे मोफत देण्यात आले. या वेळी डॉ. संजय शर्मा, डॉ. अत्तार, डॉ. वैष्णवी जोशी, विवानंद गायकवाड, सुरेश जोगदंड, डॉ. गणेश हंबरडे, डॉ. प्रदीप पाटील, नितीन कु. पाटील, नितीन वि. पाटील, नितीन भगत, संदीप वारदे, संतोष गवळी, धनंजय आचार्य, करण शेळके, जान्हवी पड्याल, विश्वास शिवंगण, रामेश्वर चौधरी आदी उपस्थित होते.

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply