पनवेल ः रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयामधील महिला विकास कक्षातर्फे 30 ऑगस्ट 2019 रोजी बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान अंतर्गत नॅचरल हेल्थ अॅन्ड एजुकेशन फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. दीपक खाडे यांचे मासिक पाळी एक वरदान आणि जैविक सॅनिटरी पॅॅडचा वापर या विषयांच्या बाबतीत जागृती यावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
या व्याख्यानाचा उद्देश संपूर्ण समाजात मासिक पाळी बाबतचे गैरसमज दूर करून जनजागृती करणे असा होता. या वेळी महिला विकास कक्षाच्या प्रमुख प्रा. डॉ. रत्नप्रभा म्हात्रे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. या प्रसंगी जिल्हा संयोजिका सुहासिनी केकाणे यांच्या समवेत निता माळी, अंजली इनामदार, सुनिता कांबळे, सुनिता गुरव तसेच नॅचरल हेल्थ अॅण्ड एजुकेशन फाऊंडेशनच्या सचिव शैला खाडे उपस्थित होत्या. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा. पूजा धांडगे, प्रा. ईशा ठाकरे, प्रा. निलिमा घरत यांनी परिश्रम घेतले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बर्हाटे यांनी सर्वांचे मनापासून कौतुक केले. शेवटी या व्याख्यान कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. निलीमा तिदार यांनी केले.