Breaking News

कार अपघातात दोघांचा मृत्यू; तिघे जखमी

पनवेल : बातमीदार

मुंबई-पुणे महामार्गावरील भोकरपाडा गावाजवळ रविवारी (दि. 10) रात्री 10.30च्या सुमारास झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला; तर इतर तिघे जखमी झाले आहेत. मृतांमध्ये सर्वेश माळी (वय 22, रा. सावळे, ता. पनवेल), भानुदास मालकर (वय 40, रा. तळवळी, ता. पनवेल) यांचा समावेश आहे.

सर्वेश आणि भानुदास हे दोघे आपल्या इतर तीन मित्रांसह स्विफ्ट कारने घरी परतत असताना, चालकाचे नियंत्रण सुटून कार तीन-ते चार पलटी घेत रस्त्याच्या कडेला पडली. कारमधील सर्वच जणांना गंभीर मार बसल्याने घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी जखमींना चांभार्लीतील रेगे रुग्णालय, पनवेल येथील गांधी, एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यापैकी दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यातील सर्वेश हा अविवाहित होता; तर भानुदासला तीन मुले आहेत.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply