Breaking News

भागूबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालयात मूट कोर्ट स्पर्धा

पनवेल ः रामप्रहर वृत्त

कायद्याचे शिक्षण घेताना विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान पुरेसे नसून, शिक्षण पूर्ण केल्यावर कोर्टात युक्तिवाद कसा करावा, याचा प्रत्यक्ष अनुभव मिळणेसुद्धा महत्त्वाचे असते. यासाठी भागूबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालयात शिक्षण घेण्यार्‍या विद्यार्थ्यांसाठी दुसर्‍या महाविद्यालयीन मूट कोर्ट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. प्राचार्या डॉ. शितला गावंड यांनी प्रास्ताविकात सांगितले की कायद्याची पदवी घेतल्यानंतर वकील म्हणून लवकरात लवकर सक्षम होण्यासाठी मूटकोर्ट स्पर्धा आणि इतर अशाच उपक्रमात सहभाग घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या स्पर्धेकरिता मुंबई उच्च न्यायालयातील नामांकीत  वकील सचिंद्र शेट्ये (उच्च न्यायालयातील माजी सरकारी वकील, तसेच महाराष्ट्र निवडणूक आयोगाचे वकील) यांनी न्यायाधीश म्हणून काम पाहिले. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की चांगला वकील होण्यासाठी योग्य मार्गदर्शनासोबत स्वतः मेहनत घेणे गरजेचे आहे. या स्पर्धेच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी 23 ऑगस्ट 2019 रोजी, मुंबई उच्च न्यायालयातील अतिरिक्त सरकारी वकील, श्रीकांत गावंड याचे मूटकोर्ट या विषयावर विशेष व्याख्यान ठेवण्यात आले होते. या स्पर्धेत प्रथम क्रमांक ऋषिकेश पाटील (पाच वर्ष अभ्यासक्रम चौथे वर्ष), द्वितीय क्रमांक सारा लाड (पाच वर्ष अभ्यासक्रम तिसरे वर्ष) आणि तृतीय क्रमांक पूर्णिमा पाटेकर (पाच वर्ष अभ्यासक्रम अंतिम वर्ष) यांची निवड करण्यात आली. त्याचबरोबर सुयश बाराटक्के (पाच वर्ष अभ्यासक्रम तिसरे वर्ष), प्रथमा भट (पाच वर्ष अभ्यासक्रम अंतिम वर्ष) आणि निखील कोटीभास्कर (तीन वर्ष अभ्यासक्रम दुसरे वर्ष) यांना उत्तेजनार्थ प्रशस्तिपत्रक देण्यात आले. या स्पर्धेत सहभागी होणार्‍या प्रत्येक विद्यार्थ्यास सहभागाबद्दल प्रशस्तिपत्रक देण्यात आले.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply