Breaking News

धुळ्यामध्ये केमिकल कंपनीत स्फोट

13 जण मृत्युमुखी, 38 जखमी, नऊ गंभीर

धुळे : प्रतिनिधी

शिरपूरजवळील रुमित केमिकल्स कंपनीत शनिवारी (दि. 31) भीषण स्फोट होऊन 13 जणांचा मृत्यू झाला असून, 38 लोक जखमी झाले आहेत. त्यातील नऊ जणांची प्रकृती चिंताजनक आहे, तर 12 जण अद्यापही बेपत्ता आहेत. बॉयलरमध्ये शॉर्टसर्किट होऊन स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू होते. 

शिरपूरमधील वाघाडी गावाजवळ ही केमिकल फॅक्टरी आहे. शनिवारी सकाळी या कंपनीत मोठा स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की यामुळे आजूबाजूच्या परिसराला हादरे बसले आणि स्फोटाचा आवाज सुमारे 15 किलोमीटरपर्यंत ऐकू गेला. आसपासच्या शेतात काम करणारे काही शेतमजूरही या स्फोटामुळे जखमी झाल्याचे सांगितले जात आहे, तसेच हादर्‍यांमुळे आसपासच्या घरांना तडे गेल्याचे वृत्त आहे. सुरक्षेच्या कारणास्तव आसपासच्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. दरम्यान, स्फोटातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत

मुंबई : धुळे जिल्ह्यातील शिरपूरजवळील रसायन कारखान्यात झालेल्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या कामगारांप्रति मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे, तसेच या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply