Breaking News

रायगडात मिशन कवच कुंडल

अलिबाग : प्रतिनिधी

कोरोना विषाणू प्रादूर्भाव व त्यामुळे होणारे मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे. रायगड जिल्ह्यात नवरात्रोत्सवादरम्यान ‘मिशन कवच कुंडल’ नावाने लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत 8 ते 10 ऑक्टोबर या तीन दिवसात 75 हजार 627 जणांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा डोस देण्यात असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील व आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांनी दिली.

मिशन कवच कुंडल मोहिमेंतर्गत प्रत्येक गावासाठीचे स्वतंत्र नियोजन करण्यात आले आहे. या मोहिमेत आरोग्य विभागासोबत इतर विभागांची मदत घेतली जात आहे. लसीकरण ठिकाणची व्यवस्था, तसेच लाभार्थीना लसीकरण ठिकाणी बोलावण्याची जबाबदारी इतर विभागाच्या कर्मचार्‍यांवर सोपविण्यात आली आहे. या लसीकरण मोहिमेची जनजागृती करण्यात आली आहे. यासाठी दवंडी देणे, मायकिंग, गृहभेटी इत्यादी माध्यमांचा वापर करण्यात आला.

मिशन कवच कुंडल मोहिमेला जिल्ह्यातील नागरिकांचाही उत्तम प्रतिसाद मिळाला असून, 8 ते 10 ऑक्टोबर या तीन दिवसांत 75 हजार 627 जणांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा डोस घेतला. यामध्ये जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांवर 37 हजार 630 जणांचे लसीकरण करण्यात आले असून, पनवेल महानगरपालिका 21 हजार 692, जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये 12 हजार 764, तर खाजगी लसीकरण केंद्रांवर तीन हजार 541 जणांचे लसीकरण करण्यात आले.

Check Also

केळवणे येथे आमदार महेश बालदींच्या प्रचाराचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष केळवणे येथे उरण मतदार संघाचे दमदार आमदार महेश …

Leave a Reply