व्हॉटसअॅपच्या युजर्सना दिलासा देणारं वृत्त आहे. व्हॉटसअॅप ग्रुपमध्ये कोणालाही अॅड करायचे असल्यास त्या व्यक्तीची परवानगी असणे आता गरजेचे होणार आहे, जर तुमची परवानगी नसेल, तर कोणीही तुम्हाला ग्रुपमध्ये अॅड करू शकणार नाही. व्हॉट्सअॅपने त्याबाबातची पडताळणी सुरू केली आहे. सध्या 2.19.55 व्हर्जनवर हे नवे अपडेट आले आहे. या नव्या अपडेटद्वारे एखाद्याला ग्रुपमध्ये अॅड करायचे असल्यास त्या युजर्सची परवानगी घ्यावी लागणार आहे. सध्या कोणालाही कोणत्याही ग्रुपमध्ये त्याच्या परवानगीशिवाय अॅड केलं जातं. अनेकांकडून विनापरवानगी कोणत्याही ग्रुपमध्ये अॅड केल्याच्या तक्रारी आल्यानंतर केंद्र सरकारने हे पाऊल उचललं आहे. या सर्व तक्रारींची माहिती सरकारी संस्थांनी केंद्र सरकारला दिल्यानंतर मंत्रालयाने व्हॉट्सअॅपला अशाप्रकारचं फिचर आणण्याची सूचना केली होती. त्यानंतर व्हॉट्सअपने हे नवे फिचर आणले. हे नवे फिचर फक्त अँड्रॉईडसाठी असणार आहे. अँड्रॉईडमध्ये फिचर सुरू झाल्यानंतर लवकच आयफोनसाठीही हे फिचर उपलब्ध होणार आहे. सेटिंगमध्ये र्ॠीेीि नावाचा नवीन पर्याय देण्यात आला आहे. र्ॠीेीविर क्लिक केल्यानंतर आतमध्ये तीन पर्याय असतील. र्एींशीूेपश, चू लेपींरलीं आणि छेलेवू असे तीन पर्याय असतील.
Check Also
‘सामना’ पन्नाशीचा झाला…
काही कलाकृतींचे महत्त्व व अस्तित्व हे कायमच अधोरेखित होत असते. ते चित्रपटगृहातून उतरले तरी त्यांचा …