Breaking News

गणेशभक्तांच्या वाटेत वाहतूक कोंडीचे ‘विघ्न’

मुंबई-गोवा महामार्ग जाम; वाहनचालक, प्रवाशांचे मेगाहाल

नागोठणे : प्रतिनिधी

गणेशोत्सवासाठी मुंबई-गोवा महामार्गावरून जाणार्‍या भाविक-भक्तांना मुसळधार पाऊस आणि वाहतूक कोंडीमुळे रविवारी (दि. 1) कमालीचा त्रास सहन करावा लागला. महाड, रत्नागिरी तसेच मुंबईकडे जाणार्‍या दोन्ही दिशांनी प्रचंड वाहने असल्याने नागोठण्यातील बापूसाहेब देशपांडे विद्यासंकुल ते वाकण या चार किलोमीटर टप्प्यात दुपारपर्यंत वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती. महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्याने मुंबईकडून कोकणात जाणार्‍या कार, जीपसारख्या वाहनांनी नागोठणे शहरातील शिवाजी चौकातून आपली वाहने नेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे शिवाजी चौकातसुद्धा वाहतुकीची कोंडी झाली होती. दरम्यान, सुकेळी खिंडीतदेखील वाहतुकीची कोंडी होत आहे हे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी कोकणात जाणारी वाहने भिसे खिंड, रोहेमार्गे कोलाडकडे वळविली.

Check Also

भिंगारी संघाने जिंकला नमो क्रिकेट चषक

पनवेल : रामप्रहर वृत्तनमो चषक 2025 अंतर्गत खारघर येथे झालेल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत भिंगारी …

Leave a Reply