Breaking News

निजामपूर विभागात राष्ट्रवादीला हादरा

माणगाव : प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रमोद घोसाळकर यांच्या शिवसेना प्रवेशापाठोपाठ माणगाव तालुक्यातील निजामपूर विभागातील कडापे ग्रामपंचायतीचे सरपंच मारुती मोकाशी यांनी येरद, येरद आदिवासीवाडी, कडापेवाडी, बांदलवाडी, कांदळगाव  येथील ग्रामस्थांसह गुरुवारी (दि. 5) शिवबंधन बांधले. त्यांचे आमदार गोगावले यांनी शिवसेनेत स्वागत केले.

 येरद गावात झालेल्या या कार्यक्रमात सांगी आदिवासीवाडी येथील ग्रामस्थांनीही शिवसेनेत प्रवेश केला. या वेळी येरद गावाचे प्रवेशद्वार व गणपती विसर्जनाचा रस्ता ही दोन्ही कामे पूर्ण केली जातील, असे आश्वासन आमदार गोगावले यांनी दिले. सरपंच मारुती मोकाशी यांनी या वेळी आपले मनोगत व्यक्त केले.

माणगाव पं. स. सभापती सुजित शिंदे, ज्येष्ठ नेते दत्तूशेठ पवार, अरुण चाळके, गजानन अधिकारी, मालती मोकाशी, प्रसाद गुरव, अनिल मोरे, सुधीर पवार, मिलिंद फोंडके, नितीन पवार, मधुकर नाडकर, रवींद्र टेंबे, लक्ष्मण महालुंगे, पवन कोलवणकर, विजय महामुणकर यांच्यासह शिवसैनिक या वेळी उपस्थित होते.

Check Also

कॉमनवेल्थ सुवर्णपदक विजेती स्वस्तिका घोषचा लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सत्कार

पनवेल : रामप्रहर वृत्तकॉमनवेल्थ स्पर्धेतील टेबल टेनिस चॅम्पियनशिप २०२६मध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत पनवेलच्या स्वस्तिका …

Leave a Reply