Breaking News

युवकांनी जनतेला न्याय देण्याचे काम करावे -कृष्णा कोबनाक

स्वराज्य प्रतिष्ठानचा वर्धापन दिन दिमाखात साजरा

म्हसळा : रामप्रहर वृत्त

स्वराज्य प्रतिष्ठान रायगड या संस्थेचा सहावा वर्धापन दिन नुकताच म्हसळा सार्वजनिक वाचनालयात दिमाखात साजरा करण्यात आला. श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील पाचही तालुक्यांतील अनेक होतकरू युवक या संस्थेच्या माध्यमातून समाजसेवा करीत आहेत. त्यांनी भविष्यात अधिक संघटित होऊन जनतेला न्याय देण्याचे काम करावे, असे आवाहन या वेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा कोबनाक यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा इतिहास युवकांनी समजून घेऊन समाजकार्य करावे, असा सल्ला प्रमुख वक्ते रोशन पाटील यांनी या वेळी दिला. कोणतेही व्यसन न करता काम करण्याची शपथ या वेळी घेण्यात आली. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भास्कर कारे, ज्येष्ठ पत्रकार संजय खांबेटे यांच्यासह संस्थेचे सभासद मावळे आणि ग्रामस्थ या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply