Breaking News

बोटी बंदरावर स्थिरावल्या

बदलत्या हवामानाचा मच्छीमारांना फटका; आवक घटल्याने मासळी महागली

मुरूड : प्रतिनिधी

पाऊस आणि वार्‍याचा वेग वाढल्याने समुद्रात जोरदार लाटा उसळू लागल्या आहेत. वातावरणात अचानक झालेल्या या बदलामुळे मच्छीमारांना किनारा गाठावा लागला आहे. त्यामुळे रायगड व रत्नागिरी जिल्ह्यातील शेकडो मच्छीमार बोटी आगरदांडा, खोरा बंदर, व एकदरा, राजपुरी खाडी येथे विसावल्या आहेत. परिणामी आवक घटल्याने मासळीचे भाव गगनाला भिडले आहेत. खोल समुद्रात जोरदार वारे वाहत असून मोठ्या लाटा उसळत आहेत. त्यामुळे मासेमारी करणे खूप जिकिरीचे झाले आहे. सदरचे वारे हे दक्षिणेकडून वाहत असल्याने मासळीही फारसी मिळत नाही. त्याचा सर्वाधिक फटका कोकणातील पाच जिल्ह्यांना बसला आहे.

यंदा 1 सप्टेंबरपासून मासेमारी सुरू झाली, मात्र बदलत्या हवामानाचा फटका मच्छीमारांना सहन करावा लागत आहे. मुरूड, एकदरा, आगरदांडा, बोर्ली, कोर्लई  परिसरातील मच्छीमारी बोटी किनार्‍यावर विसावल्याने बाजारात फार अल्प प्रमाणात मासळी येत असून, तिची चढ्या भावाने विक्री होत आहे.

-मनोहर बैले, उपाध्यक्ष, रायगड जिल्हा मच्छीमार संघ

Check Also

आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक शरद कदम यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्तआंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक तथा खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शरद कदम …

Leave a Reply