Monday , June 5 2023
Breaking News

भाजपात कार्यकर्त्यांचा ओघ सुरूच

उलवे नोडचे शेकाप कार्यकर्ते दाखल

पनवेल ः माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भाजपाची घोडदौड सुरू असून गुरुवारी (दि. 28) उलवे नोड येथील शेकाप पदाधिकार्‍यांनी भाजपात प्रवेश करून कमळ हाती घेतले.पनवेल मार्केट यार्ड येथील श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या प्रांगणात झालेल्या कार्यक्रमात शेकापचे उलवे नोड पुरोगामी युवक संघटनेचे अध्यक्ष किशोर रामदास पाटील, जयेश घरत, अभिषेक ठाकूर यांनी गुरुवारी भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी प्रवेशकर्त्यांचे पक्षाची शाल देऊन स्वागत केले. या वेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय.टी. देशमुख, तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, शहर अध्यक्ष जयंत पगडे, उलवा नोड 2 अध्यक्ष विजय घरत, युवा नेते साईचरण म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.ज्या कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे त्यांचा योग्य सन्मान राखला जाईल, अशी ग्वाही आमदार प्रशांत ठाकूर यांनी या वेळी दिली.

Check Also

खारघरमध्ये बास्केटबॉल स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद

आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती खारघर ः प्रतिनिधी खारघर स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने माजी खासदार …

Leave a Reply