Breaking News

भाषा टिकली तर संस्कृती टिकेल -मुळे

पनवेल : एखाद्या गोष्टीची माहिती मिळविण्यासाठी गुगल सर्च केले जाते, परंतु तुमच्या ज्ञानात कायमस्वरूपी भर टाकायची असेल तर गुगल सर्चवर अवलंबून न राहता पुस्तके वाचा. मराठी पुस्तके खरेदी करा. यामुळे भाषाही टिकेल आणि आपली संस्कृतीदेखील टिकेल, असे प्रतिपादन माहिती संचालनालयाचे माहिती उपसंचालक डॉ. गणेश मुळे यांनी केले. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या नवीन पनवेल शाखेच्या वतीने कामोठे येथील सुष्मा पाटील विद्यालयात मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.या कार्यक्रमाला साहित्यिक कवी डॉ. राजेंद्र राठोड, सुषमा पाटील विद्यालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पनवेलकर, कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखेचे अध्यक्ष गणेश कोळी, विद्यालयाच्या मराठी माध्यमाचे मुख्याध्यापक प्रकाश म्हात्रे, मुख्याध्यापिका मोहिनी वाघ, समाजसेवक कमलाकर गातारे, निवृत्त पोलीस अधिकारी एस. आर. कदम आदी उपस्थित होते. माहिती उपसंचालक डॉ. गणेश मुळे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, मराठी भाषेत एका शब्दाचे अनेक अर्थ पाहायला मिळतात. नव्या मराठी विश्वकोषात नव्याने तब्बल 1700 शब्दांचा समावेश केला जाणार असल्याची माहिती त्यांनी या वेळी दिली. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी मराठी भाषेविषयी भाषणे व कविता सादर केल्या. उपस्थित मान्यवरांना भेटवस्तू म्हणून साहित्यिकांची पुस्तके देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेखा म्हात्रे यांनी केले.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply