Breaking News

उरण नगर परिषदेतर्फे विसर्जनासाठी चोख व्यवस्था

उरण : वार्ताहर

माहेरपणाला आलेल्या गौरी आणि लाडक्या गणपती बाप्पांचे शनिवारी (दि. 7) उरण शहरासह ग्रामीण भागात विसर्जन करण्यात आले. या वेळी उरण नगर परिषदेने चोख व्यवस्था ठेवली होती. भाद्रपद शुद्ध चतुर्थीनिमित्त गणरायाचे मोठ्या उत्साहात व आनंदात ढोल-ताशाच्या गजरात आगमन झाले. बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाने दमदार हजेरी लावली होती, तरीही भक्तांनी या पावसाची तमा न बाळगता मोठ्या उत्साहात गणरायाचे स्वागत केले. भक्तांच्या घरचा पाहुणचार करून शनिवारी पाच दिवसांच्या बाप्पांनी भक्तांचा निरोप घेतला. अनेकांनी पावसात भिजत, बाप्पाच्या जयघोषात बाप्पाला आणि दोन दिवसाच्या माहेरवाशीण गौराईला निरोप दिला. देऊळवाडी ग्रामस्थ व युवक मंडळ यांनी नेहमीप्रमाणे बाप्पाचे विसर्जन करण्यास सहकार्य व मदत केली. उरण नगरपरिषदेच्या वतीने गौरी-गणपतीचे विसर्जन करण्याच्या ठिकाणी उरण शहर हद्दीतील मोरा जेट्टी, भवरा तलाव व उरण नगर परिषदेचा विमला तलाव यादी ठिकाणी 45 कर्मचारी व अधिकारी सज्ज ठेवण्यात आले होते. विमला तलाव येथे प्रवेश द्वाराजवळ उरण नगराध्यक्षा सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविंद्र कोळी, भाजप उरण तालुका अध्यक्ष तथा नगरसेवक रवी भोईर, उरण अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शाह, नगरसेविका प्रियंका पाटील, नगरसेवक राजेश ठाकूर, सर्व नगरसेवक, नगरसेविका, अभियंता झुंबर माने, धनुष कासारे, कर्मचारी, अधिकारी व नगर परिषदेचे संतोष पवार, संजय पवार, जगदीश म्हात्रे आदींनी सर्व भक्तांचे स्वागत करून गणपतीबाप्पा व गौराई यांच्यावर पुष्पवृष्टी केली. विमला तलाव येथे सायंकाळी 4 वाजता गणपती बाप्पाच्या विसर्जनास सुरुवात झाली. रात्री 11 वाजेपर्यंत विसर्जन सुरू होते. या वेळी पोलीस प्रशासनही सज्ज होते. नवी मुंबई सहाय्यक पोलीस आयुक्त (न्हावा शेवा पोर्ट विभाग) विठ्ठल दामगुडे व उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कडक व चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply