Breaking News

पंतप्रधान मोदींची जंगल सफारी

बेअर ग्रिल्ससोबत ‘डिस्कव्हरी’मध्ये झळकणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

सतत व्यग्र असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वेगळे रूप लवकरच पाहायला मिळणार आहे. डिस्कव्हरी वाहिनीवरील ‘मॅन व्हर्सेस वाइल्ड’ या कार्यक्रमात ते झळकणार आहेत. कार्यक्रमाचा सूत्रसंचालक असलेला साहसवीर बेअर ग्रिल्सने यासंदर्भात ट्विट करून माहिती दिली.

बेअर ग्रिल्सने ट्विटवरून एक टीझर पोस्ट केला आहे. या ट्विटमध्ये तो म्हणतो, ‘जगभरातील 180 देशांच्या लोकांना पंतप्रधान नरेंद्र मोदींची याआधी कधीही न पाहिलेली बाजू पाहायला मिळेल. प्राण्यांचे संवर्धन करण्यासाठी आणि वातावरणातील बदलाकडे लक्ष वेधण्यासाठी ते भारतामधील जंगलांमधून फिरताना दिसतील. पंतप्रधान मोदींसोबतचे ‘मॅन व्हर्सेस वाइल्ड’ नक्की पाहा डिस्कव्हरी इंडियावर 12 ऑगस्ट रोजी रात्री नऊ वाजता.’

या कार्यक्रमासाठी उत्तराखंडमधील जिम कॉर्बेट नॅशलन पार्कमध्ये चित्रण करण्यात आले आहे. साहसवीर बेअरने ट्विट केलेल्या या व्हिडीओत तो व पंतप्रधान मोदी जंगलातून, बोटीमधून प्रवास करतानाची दृष्ये पाहावयास मिळतात. हा भाग 12 ऑगस्टला रात्री 9 वा. डिस्कव्हरी वाहिनीवर प्रसारित होणार आहे.

Check Also

दिवाळी अंकांतून साहित्य क्षेत्राला नवी उंची -मंत्री आशिष शेलार

रौप्य महोत्सवी स्पर्धेचे पारितोषिक वितरण पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले …

Leave a Reply