Breaking News

ज्येष्ठ अभिनेत्री शुभा खोटे ‘जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मानित

नवी मुंबई ः प्रतिनिधी : अशोकपुष्प संस्थेच्या वतीने सलग चार वर्षे महिला दिनाच्या दिवशी विविध क्षेत्रांतील नऊ महिलांना स्त्रीशक्ती पुरस्कार प्रदान करण्यात येतो, तसेच चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ कलावंतांचा गौरव करण्यात येतो. यावर्षी साठ दशकांहून अधिक काळ आपल्या अभिनयाने मनोरंजन क्षेत्रात योगदान देणार्‍या ज्येष्ठ अभिनेत्री शुभा खोटे यांचा सन्मान जीवन गौरव पुरस्कार देऊन करण्यात आला. हा पुरस्कार ज्येेष्ठ अभिनेता अंजन श्रीवास्तव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी आयोजक अनघा लाड, उमेश चौधरी, बालकलाकार हितार्थ पाटील आणि इतर मान्यवर उपस्थित होते. याच प्रकारे विविध क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाने योगदान देणार्‍या महिलांचा सन्मानही  वाशीच्या विष्णुदास भावे नाट्यगृहात करण्यात आला. पुरस्कारप्राप्त महिलांमध्ये मोहिनी शबाडे (सहनिर्माती व संस्थापिका ग्रेसफुल लिविंग फाऊंडेशन), नगरसेविका अंजली वाळूंज (राजकीय), मधुरा सुरपुर सराफ (झी 24 तास-पत्रकारिता), प्रियांका पांचाल (मिस लावण्यवती 2018 आणि क्वीन ऑफ नवी मुंबई 2018), शिवानी साहिनी (नायिका), सुहासिनी पडाळे (शास्त्रीय नृत्य शिक्षिका), समाजसेविका ज्योती पाटील आणि स्मिता केणी यांना स्त्रीशक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. श्री करिअर अ‍ॅकॅडमीचे अशोक बाबर, पेशवाई सिल्क सारीजचे दीपक घनावत, नगरसेवक संजू वाडे, देवेंद्र खडसे, संकेत बांदेकर, अर्चना तेंडुलकर, सुनीता घायतडक, अभिनेत्री सिद्धी पाटणे यांच्या हस्ते मान्यवर महिलांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply