
पाली : प्रतिनिधी
पाली-खोपोली मार्गावरील हेदवली गावाच्या हद्दीत सोमवारी (दि. 9) रात्री एसटी बसने पादचार्याला धडक दिली. या अपघातात पादचारी काशिनाथ महादू भोय (रा. डोंगरआळी जांभूळपाडा, ता. सुधागड) यांचा जागीच मृत्यू झाला. रघुनाथ बाबूराव यशवंतराव (52) हे त्यांच्या ताब्यातील एसटी बस (एमएच-40, एन-8402) घेऊन सोमवारी पाली येथून पनवेलकडे जात होते. पाली-खोपोली मार्गावरील हेदवली गावाच्या हद्दीतील अष्टविनायक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसमोर बस आली असता रस्त्याच्या बाजूच्या गवतातून काशिनाथ भोय अचानक समोर आला व बसच्या डाव्या बाजूला धडकला. त्या वेळी त्याच्या डोक्यातून रक्तस्त्राव झाल्याने तो जागीच मयत झाला. या अपघाताची नोंद पाली पोलीस स्थानकात करण्यात आली असून, पोलीस हवालदार गजानन म्हात्रे पुढील तपास करीत आहेत.