Breaking News

कळंबोली येथे हायमास्टचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्त

महापालिका क्षेत्रातील कळंबोलीतील प्रभाग क्रमांक 10 मध्ये हायमास्ट दिवे बसविण्यात येणार आहेत. या कामाचे भूमिपूजन सिडको अध्यक्ष तथा भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी (दि. 11) करण्यात आले. या हायमास्टच्या भूमिपूजनाच्या वेळी नगरसेवक मनोहर म्हात्रे, अमर पाटील, राजेंद्र शर्मा, भाजपचे कळंबोली शहर अध्यक्ष रविशेठ पाटील, दिलीप खानावकर, संदीप पाटील, किशोर खानावकर, महेश म्हात्रे, तुकाराम मोटे, आबासाहेब, चंद्रशेखर जळे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हायमास्ट बसविल्यामुळे कळंबोली परिसर प्रकाशाने उजळून निघणार आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply