पनवेल : रामप्रहर वृत्त
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेकांची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. अशा गोरगरीबांसाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, खारघरचा राजा गणेशोत्सव मंडळ तसेच विविध समाजांचे अन्नदाते यांच्या माध्यमातून अन्नधान्याचे वाटप करण्यात येत आहे. त्या अंतर्गत भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते खारघरमधील गरीब, गरजू जनतेला मंगळवारी (दि. 1) अन्नधान्य वितरित करण्यात आले.
कोरोना महामारीमध्ये कुणावर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी भाजप ओबीसी सेल पनवेल तालुका अध्यक्ष तथा खारघरचा राजा गणेशोत्सव मंडळाचे संस्थापक अध्यक्ष विजय पाटील आणि भाजप महिला मोर्चा खारघर-तळोजा विभाग अध्यक्ष व श्री समर्थ महिला मंडळाच्या अध्यक्ष वनिता पाटील यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम घेण्यात आला. गणेश मंदिर सेक्टर 12 येथे झालेल्या या कार्यक्रमास खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, दीपक शिंदे गीता चौधरी, मोना अडवाणी आदी पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
Check Also
तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा
कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …