Breaking News

खालापुरात 15 जुगारींना अटक

खोपोली : प्रतिनिधी

रमी जुगार खेळणार्‍या 15 जणांना खालापूर पोलीस पथकाने छापा टाकून रंगेहाथ  पकडले असून त्यांच्याकडून 47 हजार 100 रुपये रोख रकमेसह जुगाराचे साहित्य जप्त केले आहे. खालापूर हद्दीतील मिरकूटवाडी येथील रोहिदास काशिनाथ पाटील यांच्या स्वामी समर्थ ट्रान्स्पोर्ट ऑफिसमध्ये काही जण  जुगार खेळत असल्याची खबर खालापूरचे पोलीस निरिक्षक विश्वजीत काईंगडे यांना मिळाली होती. त्यानुसार बुधवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास खालापूर पोलिसांनी मिरकूटवाङी येथे छापा टाकला असता रोहिदास काशिनाथ पाटील (वय 35, रा. मिरकूटवाडी), गिरिश खंडू कूडपाणे (वय 35, रा. काटरंग खोपोली), प्रशांत धोंडीबा साळुंखे (वय 40, रा. शेमडी), संजय बाळाराम पाटील (वय 40, रा. ठाणेन्हावे साजगाव), सिद्धांत प्रमोद कडव (वय 28, रा. दहिवली), नीलेश हरिभाऊ वाळे (वय 34, रा. ठाणेन्हावे), अजीज माईद्दीन धनसे (वय 41, रा. ठाणेन्हावे), संतोष अनंता पाटील (वय 40, रा. वडवळ), उल्हास किसन ठाकरे (वय 40, रा. सांगडे), रणजित वसंत पाटील (वय 27, रा. वडवळ), लक्ष्मण वामन म्हशीलकर (वय 55, रा. सांगडे), भिमा दुर्गाप्पा पवार (वय 32, रा. देवन्हावे), प्रणय भरत पाटील (वय 25, रा. शिरवली), प्रताप रामदास देशमुख (वय 31, रा. नारंगी) आणि राकेश मारुती खाडे (वय 38, रा. ठाणेन्हावे, ता. खालापूर) हे पैसे लावून रमी जुगार खेळत असताना रंगेहाथ सापडले. पोलिसांनी जुगारासाठी वापरण्यात आलेले पत्ते, वही आणि रोख रक्कम जप्त केली आहे. पकडलेल्या 15 जणांविरोधात जुगार अधिनियम 1867 कलम 4/5 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरिक्षक अंबिका अंधारे करीत आहेत.

Check Also

आदई डोंगरावर वृक्षारोपण अभियान

आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तपर्यावरण संवर्धनाचा संदेश देत आदई डोंगरावर …

Leave a Reply