पनवेल ः रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, खांदा कॉलनी, नवीन पनवेल येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या 30 स्वयंसेवकांनी पिल्लई कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, नवीन पनवेल येथे नवी मुंबई कॉलेज असोसिएशन, आशा की किरण फाऊंडेशन, तसेच गुन्हे अन्वेषण विभाग, नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या अमली पदार्थ विरोधी कार्यशाळेत सक्रीय सहभाग नोंदवला. या कार्यशाळेत पोलीस गुन्हे अन्वेषण विभागाचे सहाय्यक अजय कदम यांनी उपस्थित स्वयंसेवकांना जीवनात व्यसनामुळे होणारे तोटे व त्याचा तरुणांवर होणार परिणाम या विषयावर बोलले, तसेच तरुणांना आरोग्याची काळजी घेऊन अमली पदार्थाच्या गर्तेत न अडकण्याचा सल्ला दिला. या कार्यशाळेत सहभागी झाल्याबद्दल चांगू काना ठाकूर महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. वसंत बर्हाटे, उपप्राचार्य डॉ. एस. के. पाटील यांनी स्वयंसेवकांचे विशेष कौतुक केले.