Breaking News

खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ मंगळवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची चौक फाटा येथे सभा

पनवेल : रामप्रहर वृत्त
भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, आरपीआय, रासप, पीआरपी व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांची मंगळवारी (दि. 7) सायंकाळी 6.30 वाजता खालापूर तालुक्यातील चौक फाटा येथे जाहीर प्रचार सभा होणार आहे.
या सभेला प्रमुख मान्यवर राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण, पालकमंत्री उदय सामंत, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष भोईर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हनुमंत पिंगळे, मनसेचे जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सुधीर ठोंबरे, रामदास ठोंबरे, तालुकाध्यक्ष प्रवीण मोरे, चौक सरपंच रितु ठोंबरे, तुपगाव सरपंच रवींद्र कुंभार यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर कॉलेज, टीएनजी कॉलेजचा 100 टक्के निकाल

पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी 2024मध्ये घेण्यात …

Leave a Reply