Breaking News

कामोठे शहरामध्ये क्रीडासंकुल व्हावे

आमदार प्रशांत ठाकूर यांना निवेदन

पनवेल ः रामप्रहर वृत्त

कामोठे शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे व आज ती दोन ते अडीच लाखांच्या घरात जाऊन पोहोचली आहे, तसेच या वाढत्या लोकसंख्येनुसार युवकांची संख्या देखील वाढत आहे, परंतु कामोठे शहरामध्ये तेथील युवकांसाठी खेळण्यासाठी एकही क्रीडा संकुल नाही. त्यासाठी तेथील युवकांना खेळण्यासाठी पनवेल, नवी मुंबई किंवा मुंबईला जावे लागते, त्यामुळे या ठिकाणी क्रीडा संकुल व्हावे, अशी मागणी भाजप युवा मोर्चा कामोठे शहर अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे केली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच फिट इंडिया मुहमेंटची घोषणा केली आहे, तसेच दररोज किमान अर्धा तास व्यायाम करण्यासाठी प्रोत्साहित केले आहे, परंतु क्रीडा संकुल नसल्यामुळे तेथील लोकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे शहरामध्ये वाढत्या लोकसंख्येचा विचार करून कामोठे शहरामध्ये क्रीडासंकुल झाले, तर कामोठे शहरातील युवकांसाठी, तसेच विद्यार्थ्यांसाठी सुलभ आणि सोईस्कर होईल व त्याचा फायदा कामोठे शहरातील सर्वच जनतेसाठी होईल. तरी लवकरात लवकर कामोठे शहरामध्ये क्रीडा संकुल होण्यासाठी आपण संबंधित विभागास आदेश द्यावेत, अशी विनंती या निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन सादर करताना हर्षवर्धन पाटील, सरचिटणीस नवनाथ भोसले, तेजस जाधव, रोहित घाडगे आदी उपस्थित होते.

Check Also

रायगड जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत ओमकार वेश्वी, कर्नाळा स्पोर्टस् अकॅडमी संघ विजेते

पनवेल : रामप्रहर वृत्तगोरगरिबांचे आधारस्तंभ, दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी …

Leave a Reply