Breaking News

इंग्लंड दौर्‍यासाठी महिला हॉकी संघ सज्ज

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेसाठी आघाडीवीर राणी रामपाल हिच्याकडे भारतीय महिला हॉकी संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. ही स्पर्धा मारलो येथे 27 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबरदरम्यान खेळली जाणार आहे.

या दौर्‍यासाठी 18 जणींच्या भारतीय संघात गोलरक्षक सविता उपकर्णधार आहे. जपानमधील ऑलिम्पिकपूर्व तयारी हॉकी स्पर्धा जिंकणार्‍या भारतीय संघातील सविता आणि रजनी इथिमारपू यांनी आपले स्थान कायम राखले आहे. बचावपटू दीप ग्रेस इक्का, गुरजित कौर, रीना खोखार आणि सलिमा टेटे यांनीही स्थान मिळवले आहे. मधल्या फळीत अनुभवी नमिता टोप्पो हिने दुखापतीनंतर बर्‍याच कालावधीनंतर संघात पुनरागमन केले आहे.

असा आहे संघ

गोलरक्षक : सविता, रंजनी इथिमारपू, बचावफळी : दीप ग्रेस इक्का, गुरजित कौर, रीना खोखार, सलिमा टेटे, मधली फळी : सुशीला चानू पुखारमबम, निक्की प्रधान, मोनिका, नेहा गोयल, लिलिमा मिंझ, नमिता टोप्पो, आघाडीची फळी : राणी रामपाल (कर्णधार), वंदना कटारिया, नवनीत कौर, लालरेमसियामी, नवज्योत कौर, शर्मिला देवी.

आम्ही टोकियो ऑलिम्पिकसाठी स्थान मिळवण्याचे एकमेव उद्दिष्ट ठेवले आहे. इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी सराव शिबिर होणार आहे. या सामन्यांमुळे आम्हाला भुवनेश्वर येथे होणार्‍या एफआयएच हॉकी ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेसाठी चांगला सराव करता येईल. -शोर्ड मरिन, मुख्य प्रशिक्षक

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply