Breaking News

उपजिल्हा रुग्णालयातील 100 नवजात शिशूंना ‘जॉन्सन अॅ0ण्ड जॉन्सन’चे कीट

पनवेल ः रामप्रहर वृत्त

सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विशेष प्रयत्नांमुळे पनवेल ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय सुरु झाले आहे. त्या अंतर्गत या रुग्णालयात पहिल्या 100 नवजात शिशुंना सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून ‘जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन’चे कीट भेट देण्यात आले. सोमवारी (दि. 16) उपजिल्हा रुग्णालयात जन्मलेल्या नवजात बालकांच्या आईला नगरसेविका दर्शना भोईर यांच्या हस्ते ही भेट वस्तू देण्यात आली. या वेळी माजी नगरसेविका सुलोचना कल्याणकर, डॉ. नागराज एम. पाल, माजी नगरसेविका नलिनी शेकार, निता मंजुळे, चंद्रकांत मंजुळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या वेळी नगरसेविका दर्शना भोईर आणि डॉ. नागराज एम. पाल यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

Check Also

शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित

पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …

Leave a Reply