Breaking News

खालापुरात राष्ट्रीय लोक अदालत

14 प्रलंबित व 19 वादपूर्व प्रकरणे निकाली; 69 लाख 68 हजार 25 रुपयांची वसुली

खालापूर : प्रतिनिधी

येथील दिवाणी न्यायालय आणि तालुका विधिसेवा समिती यांच्या वतीने खालापूर येथे शनिवारी (दि. 14) घेण्यात आलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये 14 प्रलंबित व 19 वादपूर्व प्रकरणे निकाली काढण्यात आली. त्यात एकूण 69 लाख 68 हजार 25 रुपयांची वसुली करण्यात आली. खालापूर येथील दिवाणी न्यायालयात शनिवारी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात खालापूर तालुक्यातील ग्रामपंचायती, महावितरण, श्रीराम फायनान्स तसेच बँका आदींच्या संबंधित 1311पैकी 19 वादपूर्व प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात आली. त्यातून 69 लाख 68 हजार 25 रुपयांची वसुली करण्यात आली, तसेच या वेळी प्रलंबित व दिवाणी फौजदारी प्रकरणे एकूण  73 ठेवण्यात आली होती. यातून 14 प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात आली. यातून आठ हजार रुपये वसूल करण्यात आले. या लोक अदालतीमध्ये खालापूरचे दिवाणी न्यायाधीश एस. एम. गडे आणि सहदिवाणी न्यायाधीश व्ही. एस. धोंडगे यांनी प्रमुख पंच म्हणून काम पाहिले. त्यांना अ‍ॅड. एम. एम. मालकर, अ‍ॅड. ए. एस. पवार, अ‍ॅड. अमृता चाळके, अ‍ॅड. मयूर कांबळे, अ‍ॅड. आर. आर. पाटील, अ‍ॅड. सुरावकर व न्यायालयातील कर्मचारी सहाय्यक अधीक्षक एस. सी. पवार, ए.  व्ही. धामणकर, आर. एच. कडू, एस. जी. कदम, पी. आर. हरणे, एम. एस. कबले, ए. एन. दूरगडे, डी. एम. राठोड, बी. बी. विचारे, एम. टी. वावळे, एन. के. राऊत, बी. एन. सदावर्ते, जे. एस. चौधरी, गावंड आदी कर्मचार्‍यांचे सहकार्य लाभले.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply