मोहाली ः वृत्तसंस्था
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसर्या टी-20 सामन्यात 7 गडी राखून भारताने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. कर्णधार विराट कोहलीने नाबाद 72 धावांची खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. दक्षिण आफ्रिकेने विजयासाठी दिलेले 150 धावांचे लक्ष्य कोहलीने शिखर धवन आणि त्यानंतर श्रेयस अय्यरच्या साथीने पूर्ण केले. त्याच्या या नाबाद अर्धशतकी खेळीसाठी त्याचा सामनावीर पुरस्काराने गौरव करण्यात आला. यादरम्यान विराट कोहलीने पाकिस्तानचा माजी आक्रमक फलंदाज शाहिद आफ्रिदीला मागे टाकले आहे. आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा सामनावीराचा पुरस्कार पटकावणार्या खेळाडूंच्या यादीत विराट दुसर्या स्थानावर आहे.