कर्जत ः बातमीदार
नेरळ ग्रामपंचायतीची निवडणूक भाजप-शिवसेना-आरपीआय युती मोठ्या फरकाने जिंकेल, असा जबरदस्त विश्वास भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केला. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी गुरुवारी (दि. 29) आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रचार फेरी काढली.
नेरळमधील ज्येष्ठ मुस्लिम कार्यकर्ते लियाकत सहेद यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. या वेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष वसंत भोईर, जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे, जिल्हा चिटणीस रमेश मुंढे, ज्येष्ठ कार्यकर्ते पुंडलिक पाटील, तालुका अध्यक्ष पंढरीनाथ राऊत, महिला तालुका अध्यक्ष सुगंधा भोसले, भाजप किसान मोर्चा प्रदेश सचिव सुनील गोगटे, नेरळ शहर अध्यक्ष अनिल जैन, महिला शहर अध्यक्ष नीता कवाडकर आदी उपस्थित होते. त्यानंतर भाजप-शिवसेना-आरपीआय महायुतीच्या प्रचार फेरीला सुरुवात झाली. प्रभाग एकमधील जुम्मापट्टी भागात प्रचार फेरी काढण्यात आली.
या वेळी महायुतीचे थेट सरपंचपदाचे उमेदवार रावजी शिंगवा यांच्यासह नेरळमधील भाजप, शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते सहभागी झाले होते. या वेळी प्रभाग एकमधील उमेदवार मंगेश म्हसकर, अश्विनी पारधी, सदानंद शिंगवा यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांचे स्वागत केले. त्यानंतर आनंदवाडी येथे आमदार प्रशांत ठाकूर यांनी मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या.
आनंदवाडी येथे राजे प्रतिष्ठानचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष राजू मोरे यांच्या घरी जाऊन नेरळ ग्रामपंचायत निवडणुकीत मदत करण्याचे आवाहन करण्यात आले. त्यानंतर शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुरेश राणे यांच्या घरी जाऊन आमदार प्रशांत ठाकूर यांनी ग्रामपंचायत निवडणुकीसंदर्भात चर्चा केली. भाजप पक्ष कार्यालयाला भेट देऊन आमदार प्रशांत ठाकूर यांनी पाडा भागातील रहिवासी ज्येष्ठ ग्रामस्थ सावळाराम ठाकूर गुरुजी यांच्या घरी जाऊन भेट घेतली. नंतर प्रभाग चारमधील भाजप उमेदवार संजीवनी धुळे यांच्या निवडणूक प्रचार कार्यालयाला भेट दिली. या संपूर्ण प्रचार दौर्यात आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासोबत शिवसेना तालुकाप्रमुख उत्तम कोळंबे, सेनेचे माथेरान शहर संघटक प्रवीण सकपाळ, भाजपचे कर्जत पंचायत समिती सदस्य नरेश मसणे, तसेच नेरळमधील युतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यात भाजप प्रज्ञा प्रकोष्ट कोकण प्रदेश संयोजक नितीन कांदळगावकर, भाजप कर्जत तालुका सरचिटणीस प्रवीण पोलकम, युवा मोर्चाचे किरण ठाकरे, नेरळ शहरचे राहुल मुकणे, मिलिंद साने, महिला जिल्हा उपाध्यक्ष बबिता शेळके, चाचा नजे, तालुका कार्यालय चिटणीस परशुराम म्हसे, माजी नगरसेविका बिनिता घुमरे, नम्रता कांदळगावकर, आबा पवार यांच्यासह नेरळमधील युतीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper