Breaking News

चिंचवली ग्रामपंचायतमध्ये लागणार हायमास्ट दिवे

कडाव : प्रतिनिधी

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत कर्जत तालुक्यातील चिंचवली ग्रामपंचायतीला जनसुविधा योजनेंतर्गत चार हायमास्ट दिवे बसविण्यासाठी अडीच लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. चिंचवली ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात गुरुवारी (दि. 19) सकाळी भाजपचे कर्जत तालुकाध्यक्ष पंढरीनाथ राऊत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.

आपल्या ग्रामपंचायतमध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे करायची असतील, तर लोकप्रतिनिधी म्हणून सदैव तत्पर राहून काम करावे, असा सल्ला पंढरीनाथ राऊत यांनी या वेळी दिला. सरपंच सुनीता आहीर, उपसरपंच ऋषिकेश भगत, सदस्य सुप्रिया भगत, जोत्स्ना भगत, रोशन पाटील, स्वाती बोराडे, सुषमा बोराडे, उमेश भोईर, दीपाली कांबरी, विश्वास लोभी, भाजपचे सोशल मीडिया सेलचे जिल्हा सहसंयोजक विलास श्रीखंडे, तालुका संयोजक संतोष ऐनकर, ग्रामसेवक एच. पी. निरगुडा यांच्यासह ग्रामस्थ या वेळी उपस्थित होते.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply